%20(2)-800x450h.jpg)
साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील लग्नांमध्ये रुखवत हा एक महत्त्वाचा भाग असतो. वेगवेगळ्या कलावस्तूंचे एक छोटेसे प्रदर्शन लग्नामध्ये मांडले जाते, त्याला रुखवत म्हणतात. लग्नानंतर मुलगी हे रुखवत तिच्यासोबत सासरी घेऊन जाते. मुलगी आपली प्रतिभा दाखवण्यासाठी तर घरातील इतर स्रिया आपली काही आठवण मुलीजवळ रहावी म्हणून रुखवताच्या वस्तू बनवतात.
जुन्याकाळी गावं दूर दूर होती आणि प्रवासाची साधनंपण फारशी विकसित नव्हती. त्यामुळे या रुखवतामध्ये खाद्यपदार्थसुद्धा ठेवल्या जात आणि तेही नंतर मुलीसोबत तिच्या सासरी पाठवली जात; जेणेकरून प्रवासात हे खाद्यपदार्थ वापरल्या जातील. स्वाभाविकच यामध्ये ठेवले जाणारे खाद्यपदार्थ हे टिकाऊ असणं अपेक्षित असे.
कालानुरूप या रुखवताचे स्वरूप बदलत गेले. हल्ली काही गोष्टी घरी बनवलेल्या आणि काही गोष्टी भाड्याने किंवा विकत आणलेल्या, अशा पद्धतीने हे रुखवत सजवले जाते.
सुभोज्यम् गिफ्ट हॅम्परमधे एक सुबक टोपली, सहा काचेच्या बाटल्या (mason jars) आणि त्यांमध्ये महाराष्ट्रातले वेगवेगळे मसाले असा संच येतो. हे हॅम्पर्स तुम्ही सानुकूलित (customise) करून घेऊ शकता , तसेच इतर समारंभातसुद्धा आहेर करू शकता.