सुभोज्यम्- माझं कोविडमधलं अपत्य

Subhojyam – My Covid Baby (scroll down to read the English version)

कोविडपूर्व काळात म्हणजे २०१९ संपता संपता एका मैत्रिणीने मिसळ मसाला बनवणारे कोणी आहे का असं विचारलं आणि मी गमतीतच तिला उत्तर दिलं की तुला दुसरं कोणी मिळालं नाही तर मी बनवून देईन. काही दिवसांनी तिचा फोन आला, अगं बनवून देतेस का तू मिसळ मसाला? मी हो म्हटलं, प्रयोग सुरू केले होतेच. तिला मसाला बनवून दिला. तिचं काम झालं. पण मग तिची खुटपूट सुरू झाली - बिझनेस सुरू कर. मी लायसन्स करता अर्ज दिला अन् दुसऱ्या दिवशी घंटानाद आणि नंतर लॉक डाऊन घोषित करण्यात आले. मी घरी प्रयोग सुरू ठेवले; अजून काही मसाले बनवले आणि अनलॉक फेजमधे 'सुभोज्यम्' हे अपत्य जन्माला घातले (नामकरण आधीच केले होते कारण त्याशिवाय फूड लायसन्स मिळत नाही).

अर्थातच हा 'मायक्रो'पेक्षापण लहान असा उद्योग होता (आहे), जिथे मैत्रिणी आणि नातेवाईकच ऑर्डर्स द्यायचे. मी रविवारी तेवढाच मसाला तयार करून त्यांना द्यायची. हळूहळू इतरांनीही ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली आणि मी थोडे थोडे सोशल मिडिया मार्केटिंग सुरू केले

काही दिवसांपूर्वी एका शाळामित्राने एक मोठ्ठी ऑर्डर दिली तर एका वर्गमैत्रिणीने मुलीच्या लग्नात रूखवतावर ठेवायला एक हॅंम्पर करून मागितले. मग मात्र नवरोबाने जरा माझ्या स्वल्पसंतुष्टतेबद्दल माझी कानउघाडणी केली

त्यामुळे २०२० च्या सुरवातीला लागले होते तशीच आता पुन्हा झडझडून कामाला लागले आहे. या निमित्ताने माझ्या या बाळाची तुम्हा लोकांना ओळख करून देते आहे. शुभेच्छा शुभाशीर्वाद असू द्या.

आणि हो! मधल्या काळात एक छोटेसे आर्टवर्क तयार केले, ज्यात नाशिकची काही ठळक वैशिष्ठ्ये दाखवलेली आहेत. हे आर्टवर्क अर्थातच सुभोज्यम् च्या लेबलचा एक भाग आहे.

सुभोज्यम्

लोगो

देवी अन्नपूर्णा - साची पिंप्रीकर (@_pustkala)

सुलेखन - श्री. सचिन गावते (Artlook)

नाशिक आर्टवर्क -

दस्तुरखुद्द मी (गावतेंनी ते थोडे सुपर फाईन डिजिटलाईज करून दिले, लेबल्सपण डिझाईन करून दिली).

संकेतस्थळ

बिझयुनाईट टेक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड

 

Just a few weeks before the Covid pandemic hit, towards the end of 2019, a friend casually asked if I knew anyone who made misal masala. Jokingly, I replied, “If you can’t find anyone else, I’ll make it for you!”

To my surprise, a few days later she called again and said, “Hey, can you actually make some misal masala for me?”
I said yes — by then, I had already started experimenting in the kitchen. I prepared a small batch for her, and she loved it. That little gesture sparked something bigger. She began nudging me to take it seriously, to think about starting a business.

So I applied for a food license. Unfortunately, within a few days, the lockdown was announced. But I didn’t stop. I continued experimenting at home, trying different spice blends and perfecting them. During the unlock phase, I officially launched my small venture and named it ‘Subhojyam’ — the name already chosen, since it was required for the license.

It started very small — smaller than a micro-enterprise — with friends and family placing orders. Every Sunday, I’d make the masalas in small batches and hand them over. Slowly, word began to spread. Orders started coming in from beyond my circle, and I began experimenting with social media marketing.

A few days ago, a school friend placed a large order, and a classmate requested a gift hamper for the Rukhavat at her daughter’s wedding. That’s when my husband gently scolded me for being too content with small orders — and he was right.

So, here I am — back with renewed enthusiasm and the same passion I had in early 2020. On this special note, I’m excited to introduce you all to my baby, Subhojyam. Please shower it with your blessings and best wishes!

And yes! I also created a small artwork that features some of the beautiful highlights of Nashik — our beloved hometown. This artwork proudly features on Subhojyam’s label, celebrating our roots and identity.

 

Subhojyam

Logo –

Devi Annapurna – Saachi Pimprikar (@_pustkala)

Calligraphy – Mr. Sachin Gavate (Artlook)

Nashik Artwork –

Of course by Me